माहूरमध्ये दुहेरी हत्याकांड, गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून

माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मृतांत अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) यांचा समावेश आहे. दोघीही आज दि.20 रोजी सकाळी आप आपल्या शेतात कापूस वेचण्या करीता गेल्या होत्या दोघीचे शेत शेजारीच लागून आहे.

सायकाळी 4 वाजेच्या दरम्यान अडागळे शेतात गेले असता त्यांना दोघीही मुत्यू अवस्थेत दिसल्या व दोघीच्याही अंगावरील सोन्याचे दांगीने लपास केले होते. अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी माहूरचे पोलीस निरीक्षक साहेबराव चोपडे यांनी आपल्या कर्मचारीसह भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्यामुळे माहूर तालुका हादरला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात असा दुहेरी हत्येचा प्रकार प्रथमच समोर आल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की, कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली? याप्रकरणी पुढील तपास माहूर पोलीस करत आहेत.