स्मरणशक्ती परत मिळाली

16

सर एच. एन. रिलायन्स फाऊण्डेशन हॉस्पिटलमधील फिजिओ आणि न्यूरोथेरपी घेऊन दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या कमलेश मोदी (63) यांना आपली स्मरणशक्ती पुन्हा मिळाली आणि ते स्वत:च्या पायावर चालत घरी परतले. कलमेश मोदी याच वर्षी 19 ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने त्यांना तेथे असणाऱ्या एका डॉक्टरने सीपीआर दिला. त्यानंतर ते 75 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. गेल्याच आठवड्यात ते आपल्या घरी परतले.

कलमेश मोदी यांना हृदयविकाराच्या झटक्यातून वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मग त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टीनंतर त्यांच्या हृदयाची क्रिया सुरळीतपणे पार पडत होती, पण त्यांच्या मेदूला येणारे झटके चिंताजनक होते. विस्तृत न्यूरो आणि फिजिओ पुनर्वसनासाठी त्यांना सर एचएन रिलायन्स फाऊण्डेशन आणि रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. येथील सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शहा म्हणाले, ‘वेळेवर मिळालेला सीपीआर वरदानच ठरला. अँजिओप्लास्टीनंतर त्यांच्या हृदयाचे कार्य सुरळीत सुरू होते. पण त्यांना मेंदूचे झटके येत होते.

कमलेश यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ते पत्नीलाही ओळखू शकत नव्हते. मग दीड महिन्यानंतर त्यांनी डोळे उघडले. ‘त्यानंतर दोन आठवड्यांनी त्यांचा व्हेंटिलेटर काढला आणि आम्ही त्यांच्यावर ट्रकेओस्टॉमी केली आणि ती काही आठवडे तशीच होती. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि झटके नियंत्रणात आले,’ असे डॉ. शहा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या