
पुण्याच्या विद्यार्थ्यांनी देशातील पहिली चालकरहित कार विकसित केली आहे. या कारचे स्टिअरिंग कोणाच्याही हाती नसेल. चालक नसतानाही एकदम सहजतेने कारमधून प्रवास करणे शक्य होईल. विमानतळ, गोल्फ क्लब अशा ठिकाणी ही कार उपयुक्त ठरेल.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या यंत्र अभियांत्रिकी आणि अणुविद्युत आणि दूरसंचार या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी चालकरहित, स्वायत्त, विद्युत चारचाकी कार तयार केली. कारचे अनावरण बुधवारी झाले. या वेळी यश केसकर, सुधांशू मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थ्यांनी चार आसनी बोल्ट ऑन ऑटोनॉमस व्हेईकलचे प्रात्यक्षिक दाखवले.
वाहनांना अधिकाधिक अद्ययावत बनवण्यासाठी अभियंते प्रयत्नशील आहेत. याचे पुढचे स्वरूप म्हणजे स्वायत्त, चालकरहित वाहन ज्यावर टेस्ला आणि गुगल पंपन्या काम करत आहे. या इलेक्ट्रीक कारमध्ये आर्टिफिशिल इंजेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी होण्यास मदत होईल. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून त्यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला ऊर्जा देण्यासाठी लिथियम आर्यन बॅटरी वापरण्यात आली आहे, असे यश केसकर या विद्यार्थ्याने सांगितले.
ड्रायव्हरलेस कारची पॉवर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंगसाठी चार तासांचा वेळ लागतो. यामध्ये 40 किलोमीटरचा प्रवास केला जाऊ शकतो.
कारचे लॅपटॉपद्वारे कोडिंग करण्यात आले आहे. लिडर पॅमेरे, मायक्रोप्रोसेसर, विविध सेन्सर्स, अनेक एआय आणि एमएल अल्गोरिदम वापरून थ्रॉटल, ब्रेक आणि स्टियरिंगवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. कारमधील मिरर पॅमेऱयाच्या समोर कोणताही अडथळा किंवा वस्तू आली तर तिचा शोध घेतला जातो. वस्तू बरोबर कारच्या समोर असेल तर कार थांबते.
डॉ. गणेश कापंडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा इलेक्ट्रीक वाहनांचा उपयोग मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसराला जोडणे, विमानतळ, गोल्फ क्लब, विद्यापीठ या ठिकाणी करता येईल.
































































