व्हिडीओ: शिक्षक दिनी जिल्हा परिषद शिक्षकाचा वर्गातच दारु पिऊन धिंगाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जालना

जालन्यात जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने वर्गात दारू पिऊन धिंगाणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. भोकरदन तालुक्यातील वडशेद गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला असून संजय चौधरी असे या दारूड्या शिक्षकाचे नाव आहे. सध्या सोशल मिडीयावर या तर्राट शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाळेतील मुलं वर्गात येऊन वर्गात बसली होती. मात्र हे महाशय दारू ढोसून वर्गामध्ये चटईवर लोळत होते. गावातील नागरिकांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या शिक्षकाचा व्हिडिओ बनवला.मात्र याबाबत शिक्षकाला विचारले असता मला काही फरक पडत नाही, मी कुणाला घाबरत नाही, फारफार तर सस्पेंड केलं जाईल असे निर्लज्जपणे उत्तर देत होता. सोशल मीडियावर या टल्ली शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिक्षकाकडून काय आदर्श घ्यावा असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या या शिक्षकावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.