वाळलेल्या पानाने 35 लाख लोकांना टाकले संभ्रमात, व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लाखो लोकं संभ्रमात पडले आहेत. या व्हिडीओत एक वाळलेलं पान दिसत आहे, पण या पानात असे काय आहे की लाखो लोकं व्हिडीओ पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ सुरुवातीला पाहिल्यावर संभ्रमात पडाल. आधी सुरुवातीचे काही सेकंद ते वाळलेलं पान दिसत आहे आणि दहाव्या सेकंदाला एका माणसाचा हात दिसतोय ते वाळलेलं पान उचलून जेव्हा त्या पानाला उन्हात घेऊन जातो तेव्हा सर्वांना कळंत की ते वाळलेलं पान नसून फुलपाखरु होतं.

कलीमा इनच अशा जातीचं ते फुलपाखरु असून ते उष्णकटिबंधीय एशिया म्हणजेच हिंदुस्थानापासून जपानपर्यंतच्या भागात आढळले जाते. हे फुलपाखरु पंखं बंद करतं त्यावेळी ते वाळलेल्या पानासारखे दिसते. व्हिडीओ शेअर केलेल्या ट्विटर यूजर मासिमो(@Rainmaker1973) ने लिहीले की पंखं बंद केल्यानंतर ऑरेंज ओकलिफ रंगाबरोबरच वाळलेल्या पानासारखे दिसायला लागते. त्यामुळे त्या व्हिडीओत ते पाहाताच क्षणी  वाळलेले पान दिसत आहे.

आपल्या पंखांना बंद केल्यानंतर कलिमा इनचस हे फुलपाखरु अगदी वाळलेल्या पानासारखे दिसू लागते. चीनच्या पेकिंग विश्वविद्यालयाच्या एका फुलपाखरु संशोधक आणि ज्येष्ठ लेखक वेई झांगने म्हंटलेय की, फुलपाखराच्या पंखांमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना असते, मात्र ही रचना फार जटिल असते. जसे जल, थर्मोरेग्युलेशन, मेट प्रिफरेन्स आणि शिकाऱ्यापासून बचाव करता येतो. संशोधकाने सांगितले की, या फुलपाखराची रचना सरळ असते, त्यामुळे मला वाटते या फुलपाखराचे पंख अनेक विकासाच्या प्रश्नांवर उत्तर ठरु शकते.