ट्रान्सजेंडर मॉडेल नाझ ठरली ‘इप्रेस अर्थ’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पहिली ट्रान्सजेंडर ‘इंटरनॅशनल ब्युटी क्वीन’ नाझ जोशी हिने ‘इप्रेस अर्थ 2021-22’ स्पर्धा जिंकली आहे. नुकतीच ही स्पर्धा ‘व्हर्च्युअली’ पार पडली. दुबई येथे 1 जून 2021 रोजी ‘इप्रेस अर्थ’ स्पर्धा पार पडणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. त्यात 15 देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यात नाझ अंतिम विजेती ठरली.

‘इप्रेस अर्थ’ स्पर्धेची विजेती होण्याआधी नाझने मिस युनिव्हर्स डायव्हर्सिटी 2020, मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी 2020, मिस रिपब्लिक इंटरनॅशनल ब्युटी अॅम्बेसेडर, मिस युनायटेड नेशन्स अॅम्बेसेडेर हे किताब जिंकलेले आहेत. तिने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून पदवी प्राप्त केली आहे. 2013 साली लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करियर सुरू केले. नाझचे पूर्वीचे नाव ऐयाज होते. ट्रान्सजेंडरला सन्मान मिळावा, कोणताही भेदभाव न करता त्यांना समाजाने स्वीकारावे, यासाठी नाझ प्रयत्नशील आहे.