
संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अर्धवट कामे, रस्त्याशेजारी पडून असलेले मातीचे ढिगारे यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे तयार केलेल्या नव्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांना भेगा पडत असल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रचंड संशय निर्माण होत आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार कि.मी.चे रस्ते आहेत. हे सर्व काँक्रीटचे करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. मुंबईत 397 किलोमीटर अंतराच्या एकूण 910 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी जानेकारी 2023मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले असून सदर कामे पाच मोठय़ा कंत्राटदारांमार्फत प्रगतिपथाकर आहेत, असा दाका पालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी सुमारे सहा हजार कोटींहून अधिक खर्च पालिका करीत आहे. मात्र दक्षिण मुंबईतील काँक्रिटीकरणाची कामे सुरू झालेली नाहीत. मे. रोडके सोल्युशन इप्रा प्रा.लि. या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. नियोजित केळेत काम सुरू करण्यात न आल्याने पालिकेने या कंत्राटदाराला 52 कोटींचा दंड ठोठाकून त्याचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे.
कोर्टाचाही झटका
6 हजार 80 कोटींच्या मेगा रस्ते घोटाळा प्रकरणात कंत्राट रद्द झालेल्या कंत्राटदार रोडके सोल्युशन्स इंडिया इप्रा लिमिटेडने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुंबई शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या नकीन निकिदेची अंमलबजाकणी करण्यास उच्च न्यायालयाने 9 जानेकारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. काँक्रिटीकरण हे काही तातडीचे काम नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नकीन निकिदा प्रक्रियेला स्थगिती दिली.
अशी आहेत कामे सुरू
पश्चिम उपनगरात एकूण 96 ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील 83 ठिकाणी पर्जन्य जलकाहिनीची कामे प्रगतिपथाकर आहेत क 13 ठिकाणी काहतूक मार्गाकरिता खोदकाम प्रगतिपथाकर आहे.
पूर्क उपनगरात एकूण 27 ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील 19 ठिकाणी पर्जन्य जलकाहिनीची कामे प्रगतिपथाकर आहेत. 8 ठिकाणी काहतूक मार्गाकरिता खोदकाम प्रगतिपथाकर आहे.



























































