
बऱयाचदा आपण काही गोष्टी टाकाऊ (वेस्ट) समजून फेवून देतो. पण अशा ‘वेस्ट’मधून ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न करत आहेत गौतम मलिक. त्यांनी जुन्या गाडय़ांच्या सीटबेल्टपासून पर्यावरणपूरक बॅग, पर्स बनकायचे स्टार्टअप सुरू केले आहे. त्यांची ही कल्पना एवढी ‘हिट’ झालेय की देशविदेशातून त्यांच्या बॅगांना खूप चांगली मागणी येत आहे. अवघ्या पाच वर्षांत 80 लाखांचा टर्नओव्हर आणि 15 जणांना रोजगार एवढी मजल मलिक यांनी मारली आहे.
गौतम मलिक मूळचे हरियाणाचे, पण दिल्लीत वास्तव्य करणारे. त्यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण पुण्यात घेतले. पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यावर आणि तिथेच दहा वर्षे नोकरी केल्यावर ते 2011 साली दिल्लीला परतले. 2015पासून टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी बॅग आणि पर्स बनवायला सुरुवात केली. सर्कात आधी ‘वेस्ट मटेरियल अपसायकल’चा अभ्यास सुरू केला. टाकाऊ साहित्य जमवणे आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये विकणे तसं आव्हानात्मक होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला स्टार्टअप सुरू करण्याऐकजी मार्केट उभे करण्यावर भर दिला. एका कंपनीत नोकरी सुरू ठेकून मित्रपरिवार, नातेवाईक, दुकानदारांशी संवाद साधून बॅगेसंबंधी त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. 2015 साली गौतम यांनी 10 लाख रुपये गुंतकून स्कतŠचे स्टार्टअप सुरू केले. जेगरी असे त्यांच्या ब्रँडचे नाव आता विदेशातही पोचले आहे. गौतम यांनी विदेशातील काही कंपन्यांशी टायअप केले आहे.
स्टार्टअपमधून महिलांना मिळतोय रोजगार, कच्चा माल कोणता…
गौतम आणि त्यांची टीम कच्चा माल म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ मात्र ‘अपसायकल’ करता येतील, अशा वस्तू वापरतात. सीटबेल्ट, ट्रक आणि गाडय़ांचे टायर, जुने कपडे, आर्मी कॅनव्हास, खराब झालेले पॅराशूट आदी टाकाऊ वस्तू देशाच्या केगकेगळ्या भागांतून गोळा करतात. याशिकाय जुन्या बॅगांकर काम करून मार्केट ट्रेंडप्रमाणे त्यात बदल करतात आणि नव्या बॅगा तयार करतात. बॅगा तयार करण्यासाठी कोणतीही मोठी फॅक्टरी किंवा मशिनरी उभारलेली नाही. पूर्णपणे टेलरिंग मशीनचा वापर करून बॅग तयार केली जाते.



























































