EDने फारुख अब्दुल्ला यांना बजावले समन्स, पक्षाने ट्विट करत दिली थेट प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कॉन्फरन्स (NC) चे अध्यक्ष आणि जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना ED ने 31 मे रोजी दिल्लीतील मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं आहे.

ही चौकशी जम्मू आणि कश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाशी संबंधित आहे ज्याची फेडरल एजन्सीद्वारे चौकशी केली जात आहे.

31 मे रोजी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयात हजर राहण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) समन्स जारी करण्यात आला आहे.

समन्सवर प्रतिक्रिया देताना, त्यांच्या पक्षाने सांगितले की श्रीनगरचे लोकसभा खासदार अब्दुल्ला हे आधीसारखेच अधिकाऱ्यांना सहकार्य करत राहतील.

‘ईडीने जेकेएनसीचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांना समन्स बजावले आहे, हे काही नवीन नाही, हे देशातील सर्व विरोधी पक्षांसाठी सामान्य आहे. त्यांनी या प्रकरणात आपले निर्दोषत्व कायम ठेवले आहे आणि तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे आणि या प्रकरणातही ते तसे करतील,” पक्षाने ट्विटरवर पोस्ट केले.

या प्रकरणात एजन्सीने 2020 मध्ये श्री अब्दुल्ला यांची 11.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी 84 वर्षीय एनसी संरक्षकाची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे.

ED ने आरोप केला होता की अब्दुल्ला यांनी भूतकाळात JKCA चे अध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा “दुरुपयोग” केला आणि बीसीसीआय प्रायोजित निधीची लाँड्रिंग करता यावी म्हणून क्रीडा संस्थेत नियुक्त्या केल्या.