वीज कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा अपघाती विमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चोवीस तास राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुरळीत वीजपुरवठा करणाऱ्या वीज कामगारांना आता अपघाती विमा योजनेचे कवच मिळाले आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 10 लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू केली आहे. सदर विमा योजना वर्षभरासाठी असून त्याचा जवळपास 60 हजार वीज कामगारांना लाभ होणार आहे.

नैर्सिगक आपत्ती, अतिवृष्टीच्या काळात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना युद्ध पातळीवर काम करावे लागते. सदर काम करत असताना अनेकदा कर्मचारी जायबंदी होतात, मृत्यू ओढवतो. त्याची दखल घेत महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात वीज योजना सुरू केली आहे.

त्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कायमचे दोन्ही पाय, हात अपंग झाल्यास त्याला भरपाई म्हणून शंभर टक्के म्हणजे 10 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. तर जखमींना पन्नास टक्के म्हणजे 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. मार्च 2022 पर्यंत ही विमा पॉलिसी लागू असणार आहे.