जम्मू-कश्मीर: शोपियानमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. शोपियानमध्ये पहाटे सैन्यदलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये  झालेल्या कमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांच्या जवानांना यश आले आहे. जवानांनी दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त  केला आहे.

शोपियान जिल्ह्यातील केल्लर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच हिंदुस्थानी लष्कर, सीआरपीएफचे जवान आणि जम्मू-कश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली असता दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे जवानांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांनी ठार केलेल्या तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह आणि  शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच संपूर्ण परिसराला जवानांनी घेरले असून आणखी दहशतवादी आहेत का याचा शोध सूरू आहे.