
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने ‘आप’चे खासदार संजय सिंह यांची सपशेल माफी मागितली आहे. पुरवणी आरोपपत्रात सिंह यांच्या नावाचा उल्लेख टायपिंग मिस्टेक असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने जे पुरवणी आरोपपत्र दाखल केले त्यात संजय सिंह यांचे नाव आहे. त्यानंतर मात्र ‘ईडी’ने माफी मागितली आणि ही चूक सुधारून पुन्हा याचिका दाखल करू असे न्यायालयात सांगितले.
आता यावरून ‘आप’ने मात्र ईडी आणि मोदी सरकारवर टीकास्त्र्ा सोडले आहे. संजय सिंह यांनी ईडीचे संचालक संजयकुमार मिश्रा व सहाय्यक संचालक जोगिंदर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पेंद्रीय अर्थ सचिवांकडे केली आहे. तर केवळ ‘ईडी’नेच नव्हे तर मोदी सरकारनेही संजय सिंह आणि ‘आप’ची माफी मागावी अशी मागणी ‘आप’चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केली आहे. या आरोपपत्रात भाजपचे खासदार परवेश वर्मा पिंवा मनोज तिवारी यांचे नाव टाकण्याची टायपिंग मिस्टेक का झाली नाही, असा सवालही भारद्वाज यांनी केला.
राहुलऐवजी संजय
आरोपपत्रात नाव येताच संजय सिंह यांनी वकिलामार्फत ‘ईडी’ला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. या नोटिसीला उत्तर देताना ईडीच्या वकिलांनी म्हटले आहे, आरोपपत्रात राहुल सिंह यांचे नाव टाकायचे होते. त्याऐवजी चुकून संजय सिंह यांचे नाव टाकले गेले.
पंतप्रधानांना शोभत नाही
कुणाचे नाव चुकून आरोपपत्रात टाकले जाते का? याचाच अर्थ हे प्रकरणच बनावट आहे. केवळ घाणेरडय़ा राजकारणासाठी ‘आप’ला टार्गेट केले जात असून पंतप्रधानांना हे शोभत नाही, अशी टीका मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.




























































