विदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद

115

सामना ऑनलाईन । लंडन

कधीकाळी जगावर राज्य करणाऱया इंग्लंडला त्यांनीच सुरू केलेल्या क्रिकेटच्या विश्वविजेतेपदासाठी तब्बल 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 12 व्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडला अटीतटीच्या लढतीत पराभूत करीत क्रिकेट विश्वचषकावर एकदाचे आपले नाव कोरले. पण त्यांचा हा विजय खऱया अर्थाने बहुराष्ट्रीय ठरलाय. कारण इंग्लंडच्या स्पर्धेतील विजयात 7 विदेशी वंशाच्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मुख्य म्हणजे त्यांचा कर्णधार इयान मॉर्गन आयरिश वंशाचा असून या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करून संघाला जेतेपद मिळवून देणारा बेन स्टोक्स मूळचा न्यूझीलंडचा नागरिक आहे. ‘म्हणजे कुऱहाडीचा दांडा गोतास कारण’ ही म्हण किवींच्या पराभवाला कारण ठरलेल्या स्टोक्सबाबत खरी ठरली आहे.

विद्यमान इंग्लंड संघातील खेळाडू आणि त्यांचे मूळ देश
इयॉन मॉर्गन (कर्णधार) (आयर्लंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), आदिल रशीद (पाकिस्तान), जो रुट (इंग्लंड), मोईन अली (पाकिस्तान), जॉस बटलर (इंग्लंड), जेसन रॉय (दक्षिण आफ्रिका), ख्रिस वोक्स (इंग्लंड), टॉम करन (दक्षिण आफ्रिका), लियाम प्लंकेट (इंग्लंड), जोफ्रा आर्चर (वेस्ट इंडीज), बेन स्टोक्स (न्यूझीलंड), मार्क वूड (इंग्लंड), लिआम डॉवसन (इंग्लंड), जेम्स विन्स (इंग्लंड).

आपली प्रतिक्रिया द्या