Photo – लाल रंगाच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज

बॉ़लीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा ‘मिली’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच मुंबईत रिलीज करण्यात आला. यावेळी जान्हवी कपूरसह सिनेमाची संपूर्ण टीम, निर्माते आणि वडील बोनी कपूर यांच्यासोबत दिसली. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी जान्हवी लाल रंगाची साडी नेसून आली होती. या साडीच्या ब्लाऊजने तिचा लूक आणखी हॉट दिसत आहे.

साडीत जान्हवीने कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर लाल रंगाच्या साडीत जबरदस्त सुंदर दिसत असून सगळ्यांच्या नजरा तिच्यावरुन खिळून राहील्या.

या साडीवर तिने चमकदार लाल रंगाचा ब्लाउज घातला होता. हा स्ट्रॅपी ब्लाउज या साडीचा लूक आणखीनच हॉट बनवला आहे.

जान्हवी कपूरने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले. यासोबतच हलका मेकअप केल्याने तिचा लूक आणखी ग्लॅमरस होत आहे.

अभिनेत्रीचा हा लूक इतका किलर आहे की तिच्या फोटोंचे कौतुक होत आहे. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाखो लाईक्स दिले आहेत.