मनसेच्या माजी नगरसेविकेविरूद्ध महिलेला धमकावल्याचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे-पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिलेला घरात घुसून शिवीगाळ करणं आणि धमकावणं याबद्दल त्यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे-पाटील या मनसेच्या महिला शहराध्यक्षा आहेत. रुपाली ठोंबरे यांच्यासह एकूण पाच जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपा करमरकर यांनी ठोंबरे-पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. २१ जून रोजी ठोंबरे-पाटील यांनी सोनाली भारद्वाज, आशा पाटील, मोनिका कुटे, स्नेहल निकम आणि रुपेश पाटील यांच्यासह आपल्या घरात घुसून दमदाटी केल्याचा दीपा यांनी आरोप केला आहे.