ऑनलाईन मार्केटप्लेस excess2sell मंदीतही तरली

excess2sell

अतिरिक्त इन्व्हेंटरी लिक्विडेशनसाठीचे हिंदुस्थानातील सर्वात मोठे ऑनलाईन मार्केटप्लेस excess2sell.com ने सतत दोन तिमाहीपासून मंदावलेल्या हिंदुस्तानच्या GDP मध्ये विकास दर्शवला आहे. याच कालावधीत excess2sell.com च्या B2B व्यवसायाने 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साध्य केली आहे व अशा रीतीने सर्वसामान्य मंदीच्या ट्रेंडवर मात केली आहे.

Excess2sell.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन शर्मा म्हणाले, “गेल्या तीन तिमाहींपासून आम्ही निरंतर वृद्धी करत आहोत आणि अर्थव्यवस्थेतील मंदीच्या सर्वसामान्य ट्रेंडपासून अलिप्त राहिलो आहोत. उलट, आमच्या व्यवसायाने जानेवारी ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 150 टक्क्यांनी वृद्धी केली आहे. या कालावधीतील दरमहा 100% वाढ दाखवणारे आकडे दर्शवले गेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या व्यवसायात निरंतर वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये आमचा रेव्हेन्यू बेस 41.58 लाख रु होता, जो 2017-18 मध्ये 12.9 कोटी रु. झाला म्हणजेच एका वर्षात तब्बल 3000% वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये रेव्हेन्यू 70 कोटी रु. झाले म्हणजे पुन्हा मागील वर्षाच्या तुलनेत 500% वाढ झाली.”

हिंदुस्थानातील B2B बिझनेस बेस 50 मिलियनचा आहे. हा देशाच्या 14 मिलियन रिटेलर बेसला वस्तूंचा थेट पुरवठा करणारा थेट पुरवठादार असला तरी, त्याची पोहोच खुरटलेली राहते. हिंदुस्थानात ई-टेलिंगची वाढ झपाट्याने होऊन ते $525 बिलियनचा उद्योग बनला आहे, कारण B2C मार्केटमध्ये असल्याचा फायदा त्याला होतो. पण B2B ई-कॉमर्स मार्केटला अजून स्वतःच्या क्षमता पूर्णपणे समजलेल्या नसून त्यांना सध्या सोल्युशन आधारित टेक्नॉलॉजीच्या हस्तक्षेपाची गरज आहे. या टेक रिक्युलेसीव्ह क्षेत्रातील उणीव भरून काढण्यासाठी excess2sell.com ने B2B क्षेत्रातील कंपन्यांना या मंचावर येण्यासाठी निमित्त आणि प्रोत्साहन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या