वैभवशाली विरासत जहांगीर कलादालनात गोपाळ परदेशी यांचे चित्रप्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुने वाडे, त्यांचे नक्षीदार दरवाजे, त्यातील विविध वस्तू, पंदील, आयुधे म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. या परंपरेचे दर्शन घडवणारे चित्रकार गोपाळ परदेशी यांचे ‘विरासत’ प्रदर्शन जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. त्यातून परदेशी यांनी मराठवाडा, पुणे आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण परिसरातील सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडविले आहे. हे प्रदर्शन 23 ते 29 मार्चदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना विनामूल्य बघता येईल.

गोपाळ परदेशी यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे आजच्या काळात असलेले अनन्यसाधारण महत्त्व यावर कलात्मकतेतून प्रकाश टाकला आहे. पुढच्या पिढीला ही विरासत नीट समजावी हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. या चित्रांतून रसिकांना थेट भूतकाळाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.