
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
परळी मार्गावरील चार रेल्वेगाड्यांना कायमस्वरुपी तीन वाढीव डब्बे जोडण्यात येणार आहेत. वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे जोतिर्लिंग असल्याने या ठिकाणी येणारी वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेवून, नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या 10 सवारी गाड्यात प्रत्येकी 3 डब्बे कायम स्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 21 जुलै 2019 पासून हा निर्णय अमलात येइल. डब्बे वाढविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 575 54 आदिलाबाद – परळी व गाडी क्रमांक 57540 परळी – अकोला या गाड्यांना 22.07.2019 पासून , गाडी क्रमांक 57539 अकोला – परळी 23.07. 2019 पासून आणि गाडी क्रमांक 57553 परळी -आदिलाबाद गाडीला 24.07.2019 पासून वाढीव डब्बे जोडण्यात येणार आहेत. या वाढीव डब्यांचा प्रवाश्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.






























































