लग्नाचे आमिष दाखवत तरुणींकडून पैसे उकळण्यासाठी बनावट बँक खाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्यांना बनावट बँक खाती खोलून देणाऱ्या टोळीतल्या अझहर अन्सारी आणि राजकुमार पांड्ये या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे 50 हून अधिक बँक खाती खोलल्याचे समोर येत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका आरोपीने 44 लाख 93 हजार किंमतीची आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार एका तरुणीने मध्य सायबर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुयोग अमृतकर, नीलेश हेंबावडे व पथकाने तपास सुरू केला. दिल्ली एअरपोर्टवर पोहचलो असून सोबत दोन अमेरिकन डॉलर्स असल्याने पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपींनी पैशांची मागणी करत महिलेकडून विविध बँक खात्यावर 44 लाख 63 हजार उकळले होते.