कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

3
suicide

सामना प्रतिनिधी, श्रीगोंदा

तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय45) यांनी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील पेडगाव येथील माजी सरपंच पती बळीबा घोडके (वय वर्षं 45) यांची पेडगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुमारे तीन एकर शेतजमीन आहे.

त्यांच्यावर पतसंस्था व खाजगी सावकारांचे कर्ज होते. दुष्काळामुळे व सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. मासे विक्री व दुग्धव्यवसाय करूनआपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते. आज सकाळी घरचे दूध डेअरीला घातले. घरी गॅसची टाकीही भरून दिली. त्यानंतर ते शेतात गेले व सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी आहेत. धाकटा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे. तर थोरल्या मुलाचे लग्न 21 तारखेला होते. परंतु लग्नाला अवघे दहा दिवस उरले होते. त्यापूर्वीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.