
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी संघर्ष यात्रेला अकोला जिह्यात प्रत्येक गावात तुफान प्रतिसाद मिळत असून जागोजागी शेतकरी या पदयात्रेचे स्वागत करत आहेत. मोठय़ा संख्येने लोकं या यात्रेत सहभागीही होत आहेत. देवेंद्रजी 2014 ला तुम्ही कापूस दिंडी काढली, कापसाला भाव मागितला आज 2024 आहे. 2014 लाच तुम्हीच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या अशी मागणीही केली होती आणि आज सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत आहे. अशा शब्दांत संघर्ष यात्रेदरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेवर कडाडून टीका केली.
देवेंद्रजी आता तर राज्यात आणि केंद्रात भाजपाचीच सत्ता आहे. मग सोयाबिनला का अपेक्षित भाव देत नाही, असा सवालही नितीन देशमुख यांनी केला. ते पुढे म्हणाले, शिवसेना सदैव शेतकऱयांची पाठराखण करेल, शेतकऱयांनी कष्टाने पीकवलेल्या पिकांना भाव मिळालाच पाहिजे यासाठी ही खशेतकरी संघर्ष यात्रा आहे, असेही नितीन देशमुख यावेळी म्हणाले. पदयात्रेत नितीन देशमुख यांच्यासह उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले आहेत.




























































