नात्याला काळीमा, दारूच्या नशेत सासऱ्याचा सूनेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नालागड

सासरा आणि सून या नात्याला बाप-लेकीच्या नात्यासारखे पाहिले जाते, परंतु याच नात्याला काळीमा फासणारी घडना उघडकीस आली आहे. हिमाचल प्रदेशमधील नालागडमधील रामशहर परिसरात 50 वर्षांच्या सासऱ्याने आपल्याच मुलाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं नराधम सासऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरे दारूच्या नशेमध्ये घरी आले आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बळाचा वापर करत मला खोलीत फरफटत नेले आणि माझ्यावर अत्याचार केला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची कसून चौकशी सुरू असून पीडित महिलेच्या काही वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.