#AYODHYAVERDICT – उद्या लागणार अयोध्येचा ऐतिहासिक निकाल

रामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्याच येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या खटल्याचा निर्णय उद्या लागणार आहे. सकाळी 10.30 वाजता या सुनावणीला सुरूवात होणार आहे.

अयोध्या प्रकरणाचा लवकरच निकाल लागणार म्हणून संपूर्ण देशात सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्याराज्यात पोलीस आणि सैनिक तैनात करण्यात आले होते. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या कानाकोपर्‍यात सैनिक आणि पोलीस पहारा देत आहेत. शासनाने सोशल मीडियावरही नजर ठेवली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अयोध्या प्रकरणाचा निर्णय उदारपणे स्वीकारा, रा.स्व. संघाचे आवाहन

अयोध्या प्रकरणी 1992 ला दाखल गुन्ह्यातील 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही

अयोध्या दहशतवाद्यांच्या रडारवर,सात पाकडय़ांची नेपाळमार्गे उत्तर प्रदेशमध्ये घुसखोरी

 

अयोध्या प्रकरणाच्या निर्णयापूर्वी मौलवी, संघ नेत्यांची बैठक; शांतता राखण्याचे आवाहन

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या