लग्नापुर्वी प्रियकराने प्रेयसीला दिली अनोखी भेट…उभी राहिली विचित्र अडचण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा प्रेयसीसाठी प्रियकर विविध भेटवस्तू आणतात. मात्र, एखादी भेटवस्तू आपल्या व्यक्तीसाठी अडचणीची ठरेल, याचा अंदाज त्यांना नसतो. लंडनमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पेरिसिया नावाच्या तरुणीला तिचा प्रियकर विलिसने दिलेल्या भेटीमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.

विलिसने पेरेसियाला प्रपोज करण्यासाठी खास भेट आणली होती. त्याने तिला प्रपोज करत तिच्यासाठी बनवलेली दोन लाखांची अंगठी तिला भेट दिली. मात्र, ही भेटच पेरेसियाची मोठी अडचण ठरली. तिने विलिसला होकार दिल्यावर त्याने ही अंगठी तिच्या बोटात घातली. मात्र,ही अंगठी पेरेसियाच्या बोटात फसली. अनेक प्रयत्न करुनही ती निघत नव्हती.

अनेक प्रयत्न करूनही अंगठी निघाली नाही. मात्र, त्यामुळे पेरेसियाच्या बोटांना सूज आली. अंगठी घातलेले बोट काळेनिळे पडले. त्यामुळे तज्ज्ञांच्या पथकाला बोलवावे लागले. त्या पथकाने काळजी घेत अंगठी कापली आणि पेरसियाची अडचणीतून सुटका केली. पेरेसियाला लग्नापूर्वी सरप्राइज भेट देण्यासाठी आपण तिच्या बोटातील आधीच्या अंगठीचे माप घेतले होते. मात्र, ती अंगठी ती दुसऱ्या बोटात घालत असल्याचे आपल्या लक्षात आले नव्हते. त्यामुळे आपली अनोखी भेट पेरेसियाला अडचणीची ठरली, असे विलीसने सांगितले.