धान्याने खचाखच भरलेल्या शासकीय गोदामला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय जोशी । पाटोदा

पाटोदा येथील धान्याने खचाखच भरलेल्या शासकीय गोदामाला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत धान्याचे रिकामे पोते जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात येत नसल्याने धान्य जळण्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आग लागली की लावली या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

शनिवारी सायंकाळी अन्न-धान्याच्या शासकीय गोदामाला आग लागली. या आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती लोकांना मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. माहिती देऊनही प्रशासनाने येण्यास उशीर केल्याने एकच गोंधळ उडला. शेवटी नागरिकांनी व प्रशासनाने एकत्र येत आग विझवली, पण आगीमध्ये नुकसान किती झाली अजून समजु शकले नाही.