मानवी विष्ठेपासून बनवणार जेट इंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रज्ञांनी एक महत्वाकांक्षी प्रयोग आणला आहे. आता मानवी विष्ठेपासून विमानांसाठी इंधन बनवता येणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिस्टल आधारित कंपनी फायरफ्लाय ग्रीन फ्यूल्सने पूर्णपणे मानवी विष्ठेपासून बनवलेले जेट इंधन विकसित केले जाणार आहे. हे नवे इंधन रासायनिकदृष्ट्या जीवाश्म आधारीत केरोसीन असले तरी, त्यामध्ये कार्बनचे प्रमाण नसणार आहे.

जागतिक कार्बनडाय उत्सर्जनामध्ये विमान चलनाचा वाटा सुमारे 2.5 टक्के आहे. ही संख्या लहान असल्यासारखे वाटत असले तरी, आगामी काळात त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विमान वाहतुकीकरीता इंधन महत्वाचे आहे, आणि इंधनातून कार्बन बाहेर काढणे कठीण आव्हान आहे.

विमान वाहतूक उद्योगातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी इलेक्ट्रित किंवा हायड्रोजनवर चालणाऱ्या विमानांमध्ये बदल होण्यास बरीच वर्षे लागतील, म्हणूनच यावर उपाय म्हणून शाश्वत विमान इंधनाकडे पाहिले जात आहे.