तरुणाच्या मानेच्या आरपार गेला मासा, पाहा हे धक्कादायक फोटो

1122

मासेमारी करताना माशाने केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सुसरीसारखं टोकदार तोंड असलेला हा मासा त्या तरुणाच्या मानेतच घुसला. हा भयंकर प्रकार इंडोनेशियात घडला आहे.

youth-indonesia-1

मोहम्मद इदुल असे त्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या पालकांसोबत सुलावेसी प्रांतात राहतो. इदुल त्याच्या वडिलांसोबत मासेमारी करायला गेलेला असताना. फ्लाईंग नीडलफिश या माशाने त्याच्यावर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात माशाचे टोकदार तोंडच इदुलच्या मानेत घुसले. त्यानंतर इदुलला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे माशाचे तोंड कापून त्याच्या मानेतून काढण्यात आले. त्यानंतर इदुलच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. इदुलची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप तो आयसीयूमध्येच आहे. इदुलवर झालेल्या हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या