
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेला आयसीसी टी-20 वर्ल्डकप चांगलाच रंगात आला आहे. टी-20 मधील टॉपच्या समजल्या जाणाऱ्या संघांनाही नवख्या संघांनी विजयासाठी चांगलेच झुंझवले. अखेरच्या षटकांपर्यंत जाणाऱ्या सामन्यांमुळे क्रीडाप्रेमींचाही उत्साह वाढत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये कोणते चार संघ सेमीफायनल गाठतील याचे भाकीत वर्तवले आहे.
मायकल क्लार्क याने या यादीमध्ये दोन वेळच्या विजेत्या इंग्लंडला स्थान दिलेले नाही. इंग्लंडने 2010 आणि 2022 मध्ये टी-20 वर्ल्डकप उंचावला होता. मात्र क्लार्कने इंग्लंडला डावलून यजमान हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे चार संघ सेमीफायनल गाठतील असे भाकीत वर्तवले आहे.
क्लार्कने निवडलेल्या चार संघांपैकी तीन संघांनी विजयाने सुरुवात केली आहे. हिंदुस्थानने पहिल्या लढतीत अमेरिकेवर 29 धावांनी विजय मिळवला होता, न्यूझीलंडने अफगाणिस्तानला 5 विकेट्स राखून नमवले, तर दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा 57 धावांनी पराभव केला. तर ऑस्ट्रेलियाने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
ICC T20 WC 2026 – डिव्हिलियर्सने निवडले ‘टॉप-4’ संघ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला डच्चू!
हिंदुस्थान प्रबळ दावेदार
क्लार्कने हिंदुस्थान थेट अंतिम फेरी गाठेल असे म्हटले आहे. हिंदुस्थान वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार असल्याचा तो म्हणाला. हिंदुस्थान सध्या जगातील सर्वोत्तम टी-20 संघ आहे. मायदेशात खेळण्याचा दबाव असला तरी हिंदुस्थानी परिस्थितीचा सूर्यकुमार यादवच्या संघाला फायदा होईल, असे तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियालाही संधी
ऑस्ट्रेलियाने टॉ-4 संघांमध्ये मिळवली तर ते दडपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि अंतिम फेरीतही पोहोचू शकतात, असेही क्लार्क म्हणाला.
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेही रेसमध्ये
हिंदुस्थान प्रबळ दावेदार असला तरी आणखी पाच ते सहा संघ असे आहेत जे हा वर्ल्डकप जिंकू शकतात, असे क्लार्क म्हणाला. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकाही रेसमध्ये असल्याचे त्याने म्हटले.


























































