
राजधानी दिल्लीत कोरोनाने कहर माजविला असतानाही देशातील चार विमान कंपन्यांनी प्रवाशांचे कोरोना अहवाल न तपासताच राज्यात प्रवेश दिल्याने चार विमान कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या चारही विमान कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्ली सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱया प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली असताना देखील या विमान कंपन्यांनी हलगर्जीपणा करीत अहवाल तपासले नसल्याचे कळते. यात इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्याचा समावेश आहे.




























































