
सामना ऑनलाईन । गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शिरपूर डॅमजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये दोन्ही ट्रकच्या ड्रायव्हर आणि क्लिनरचा सामावेश आहे. अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून, धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
























































