राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अलवर

बेरोजगारीला कंटाळून राजस्थानच्या अलवरमध्ये चार तरुणांनी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाचा मृत्यू उपचारादरम्यान इस्पितळात झाला.

‘नोकरी मिळत नाही तर जगून तरी काय करायचे’ अशी खंत चार तरूणांची होती. अशी माहिती त्यांचा मित्र आणि प्रत्यक्षदर्शीने म्हटले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. सत्यनारायण, ऋतुराज, मनोज आणि अभिषेक असे मृत तरुणांचे नाव आहेत. यात अभिषेक गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी ही घटना अत्यंत दुःखी असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.