गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूकप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कांदिवली येथील व्यावसायिकाला 10 मे रोजी मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात त्यांना गोल्ड ट्रेडिंगसाठी इच्छुक आहेत का, अशी विचारणा केली. सुरुवातीला त्याने ट्रेडिंगसाठी नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एका महिलेचा फोन आला. आपण हाँगकाँगच्या एका गोल्ड ट्रेडिंग कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. कंपनीची माहिती देऊन सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर व्यावसायिकाला मोबाईलवर एक लिंक पाठवली गेली. त्या लिंकमध्ये कंपनीची माहिती होती. गोल्ड ट्रेडिंगसाठी खाते उघडण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने दोन महिन्यांत साडेसहा लाख रुपये गुंतवले होते. गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रेडिंग खाते ब्लॉक केले गेल्याचे उघड झाले.