पंजाबमध्ये मिळणार कोरोनाची लस मोफत, ममता बॅनर्जी नंतर कॅ. अमरिंदर सिंह यांची घोषणा

पश्चिम बंगाल सरकारनंतर पंजाबनेही मोफत कोरोनाची लस देण्याची घोषण केली आहे. पंजाब सरकारने पहिल्या टप्प्यात सामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्याची जाहीर केले आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोफत कोरोनाची लस दिली जाईल असे जाहीर केले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की जर केंद्राने कोरोनावरील लस मोफत नाही दिली राज्य सरकार मोफत लस देईल.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. देशात कोरोनाची लस मोफत दिली जाईल की नाही याबात सरकारने कुठलीही घोषणा केलेली नाही. सध्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यात प्रथम कोविड योध्यांना ही लस दिली जाईल. त्यानंतर 50  वर्षेहून अधिक वय असलेल्या आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा लोकांना ही लस दिली जाणार आहे.

बिहार निवडणुकीपूर्वी भाजपने कोरोनाची लस मोफत दिली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यावरही बिहार सरकारने किंवा भाजपने जाहीर घोषणा केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या