
मेष (ARIES – Wednesday, May 17, 2023)
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैशाची बचत केल्यामुळे यशस्वी व्हाल. घरी धार्मिक कार्य होईल. गाईला गूळ पोळी खाऊ घाला. नातेसंबंध जपताना काळजी घ्यावी लागेल. कामानिमित्त परदेश प्रवासा करावा लागण्याची शक्यता आहे. कोणालाही उगाच आश्वासने देऊ नका.
शुभरंग : हिरवा
वृषभ (TAURUS – Wednesday, May 17, 2023)
पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. सर्व अडचणींवर हसत मात कराल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आखाल. प्रिय व्यक्तिसोबत फिरायला जाल. प्रिय व्यक्तिची नाराजी ओढवून घेऊ नका. वरिष्ठ कौतुक करतील. रात्री जेवताना घरातील व्यक्तिंशी वाद घालू नका. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल.
शुभरंग : आकाशी
मिथुन (GEMINI – Wednesday, May 17, 2023)
वडाच्या झडाला दूध वाहा. सौंदर्य वाढीसाठी प्रयत्न कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिंसाठी वेळ काढाल. नवीन उपक्रम हाती घ्याल. रिकामा वेळ घरातील साफसफाई काढण्यात घालवाल. चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पांढरा
कर्क (CANCER – Wednesday, May 17, 2023)
लोकांची मदत कराल. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे. प्रवासामुळे धावपळ होईल. कुमारिकांना गोडधोड खाऊ घाला. जुन्या आठवणी जागवून ताजेतवाने वाटेल. उत्पन्नाचा नवा मार्ग सापडेल. कावळ्याला दही-भात ठेवा. एकाग्रतेसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचा. लोकं तुमच्या मताचा आदर करतील.
शुभरंग : केशरी
सिंह (LEO – Wednesday, May 17, 2023)
धार्मिक कार्य करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. मदतीचा हात देण्याची तयारी नातेवाईक दर्शवतील. अनावश्यक काळजी करत बसू नका. स्वत:साठी वेळ काढा. आत्मचिंतन कराल. सकारात्मक राहाल. आपले गुपित कोणालाही सांगत बसू नका.
शुभरंग : पांढरा
कन्या (VIRGO -Wednesday, May 17, 2023)
पांढऱ्या रंगाचे बूट घाला. ध्यानधारणा करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. जोडीदार तुम्हाला घरच्या कामात मदत करेल. हातून चूक होण्याआधीच सावध राहा. आहारात फळांचा समावेश करा.
शुभरंग : मोरपिसी
तूळ (LIBRA- Wednesday, May 17, 2023)
हिरव्या रंगाचा रुमाल खिशात ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात गुंताल. कामाच्या जागी स्वत:ला सिद्ध करावे लागेल. आजचा दिवस चांगला जाईल. एकाग्रता साधाल. घरी दुर्गासप्तशतीचा पाठ वाचा. शनिवारी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घ्या. पांढरा पोषाख परिधान करा.
शुभरंग : तांबडा
वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, May 17, 2023)
चांदीची अंगठी बोटात गाला. खेळाचे आकर्षण वाटेल. ध्यानधारणा कराल. नातेवाईकांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. जोडीदाराच्या भावना जाणून घ्या. व्यावसायिकांना मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. मानसिक ताण घेऊ नका. आवडते पुस्तक वाचनाचा आनंद घ्याल. कुटुंबियांसोबत मॉलमध्ये खरेदीला जाल.
शुभरंग : लाल
धनु (SAGITTARIUS – Wednesday, May 17, 2023)
गुरुवारी केळे खाणे टाळा. आरामात राहण्याचा आनंद आज लुटाल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. समाजातील वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोकं तुमचा सल्ला मागतील. जोडीदाराच्या प्रेमळ वागणुकीमुळे आजचा दिवस सुंदर जाईल. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : गुलाबी
मकर (CAPRICORN – Wednesday, May 17, 2023)
त्रिफळा चूर्ण घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. पैसे सहजपणे खर्च होतील. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखाल. आवडते पुस्तक वाचन, संगीत ऐकणे यात वेळ घालवाल. कला जोपासण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : हिरवा
कुंभ (AQUARIUS – Wednesday, May 17, 2023)
घरात काम करताना विशेष काळजी घ्या. कोणतीही वस्तू हाताळताना काळजी घ्या. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. परिसंवाद आणि प्रदर्शनाला भेट द्याल. नवीन लोकांशी संपर्क साधाल. ज्ञानात भर पडेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभरंग : राखाडी
मीन (PISCES – Wednesday, May 17, 2023)
आशावादी राहाल. पिवळ्या रंगाचे कापड ब्राह्मणाला दान कराल. स्वत:कडे सकारात्मकपणे पाहा. घराबाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी खास बेत आखेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार कराल. स्वयंसेवी कामाचा उपयोग होईल. शिव मंदिरात अभिषेक करा.
शुभरंग : नारिंगी




























































