राज्यातल्या ५१ किल्ल्यांवर लोकवर्गणीतून स्वच्छतागृह बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपुर

राज्यातील ५१ किल्ल्यांवर एकही शौचालय नाही. पण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर लोकवर्गणीतून स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत लेखी उत्तरात सांगितले. पुरातत्व विभागाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या तपशिलावरून राज्यातील गडकिल्ल्यांवर एकही शौचालय नसल्याचे निदर्शनास आले असून लोकवर्गणीतून गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृह बांधण्याची योजना आहे काय, असा प्रश्न आमदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना ५१ गडकिल्ल्यांवर एकही शौचालय नाही, पण गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृह बांधण्यसाठी संस्थेने लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या निधीतून शौचालय बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.