अकरावीची शेवटची फेरी गुरुवारपासून, 26 ऑगस्टला गुणवत्ता यादी झळकणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची शेवटची फेरी गुरुवार, 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत सहा प्रवेश फेऱया होऊनदेखील अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी शेवटची संधी असेल.

विद्यार्थी 17 ते 23 ऑगस्ट, रात्री 8 वाजेपर्यंत नावनोंदणी करू शकतात. शिवाय अर्जात बदल, पसंतीक्रम भरणे, कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. 26 ऑगस्टला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने अद्याप दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. येत्या काही दिवसांत हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फेरीत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 26 ते 31 ऑगस्ट, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान इनहाऊस, अल्पसंख्याक आणि बायपह्कल शाखेतील प्रवेश घेण्याची प्रक्रियादेखील महाविद्यालय स्तरावर होणार आहे.