विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी याला गडचिरोली यालिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ओंकार रामचंद्र अंबपकर रा. गुलमोहर कॉलनी गडचिरोली असे आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.

लेखा व वित्त अधिकारी अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे. 16 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान लेझर काढण्याच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या वित्त व लेखा अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे ठाणेदार अरविंद कतलाम यांनी दिली आहे.