गलवान हिंसाचाराबाबत अखेर चीनची कबुली, संघर्षात पीएलएचे पाच सैनिक गमावल्याचा दावा

galwan-valley

पूर्व लडाखच्या गलवान खोऱयातील हिंसाचाराबाबत लपवाछपवी करणाऱ्या चीनने अखेर कबुली दिली आहे. 15 जूनला घडलेल्या या संघर्षात पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) पाच सैनिक मारले गेले, असे चीनने प्रथमच मान्य केले आहे. याआधी केवळ एक सैनिक गमावल्याचा दावा चीनने केला होता. हिंदुस्थानसोबत झालेल्या बैठकीत चीनने मृत सैनिकांच्या आकडय़ाबाबत तोंड उघडले. दरम्यान, चीनचा हा दावाही अर्धसत्य असल्याचे बोलले जात आहे.

लडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-चीनमध्ये बैठक झाली. यावेळी चीनच्या सैन्याचा एक कमांडिंग ऑफीसरही उपस्थित होता. या बैठकीत चीनने कबुली दिली. चीन आणि अमेरिकेत महत्त्वाची बैठक होणार होती. त्याच अनुषंगाने चीनने गलवान खोऱ्यातील मृत सैनिकांच्या आकडय़ाबाबत लपवाछपवी केली, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. हिंदुस्थान व अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, गलवानमध्ये चीनचे कमीत कमी 40 सैनिक मारले गेले होते. पूर्वेत्तर सीमेवर हिंदुस्थान आणि चीन साप्ताहिक रोटेशनच्या आधारे गस्त घालतात. पूर्व लडाखमध्येही हेच धोरण अवलंबले जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या