
सामना प्रतिनिधी । ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाणे लोकसभेसाठी दिलेली उमेदवारीची ऑफर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी बुधवारी धुडकावून लावली आहे. मला दिल्लीत जाण्यात मुळीच रस नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे नाईक यांनी जाहीर केले. ठाणे लोकसभेच्या बोहल्यावर पक्षातून कोण चढणार याचीच चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू होती.
ठाणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी गुरुवारी शरद पवार यांनी ठाण्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हायटेक संवाद साधला. याकेळी गणेश नाईकांच्या उमेदकारीचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. आजच उमेदकारी घोषित करा, अशीही गळ त्यांनी पवारांना घातली. नाईकांनी निकडणुकीच्या लढाईची तयारी केली, तर त्यांना हो म्हणा, असे पवारांनी शेजारीच बसलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितले. यावेळी सभागृहातच ठराव मांडा आणि थेट अर्ज भरायला जा, असेही पाटील यांनी गणेश नाईक यांनी सांगितले.
मला दिल्लीत रस नाही
पवारांच्या गुगलीनंतर नाईकांनी पत्रकारांशी बोलताना मला दिल्लीत जाण्यात रस नसल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापेक्षा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असे नाईकांनी सांगितले. गेल्या वेळच्या निवडणुकीत पुत्र संजीव नाईक यांचा दारूण पराभव झाला होता. त्याचा धसकाच गणेश नाईक यांनी घेतला आहे. त्याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेली शिवसेनेची ताकद व गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे यामुळेच नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणातून काढता पाय घ्यावा लागला असल्याची चर्चा आहे.



























































