
हरयाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका समलैंगिक तरुणाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी पैसे न दिल्याने हा तरुण चिडला होता. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले आहे. अभिषेक असे अरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक रोहतकमध्ये आपले आई वडील बहीण आणि आजीसोबत राहत होता. अभिषेक समलैंगिक होता आणि त्याला लिंगबदल करून मुलगी व्हायचे होते. तसेच मुलगी होऊन एका मुलाशी लग्नही करायचे होते. लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी अभिषेकने वडिलांकडे पैसे मागितले. परंतु वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा अभिषेकला राग आला.
टीव्हीवरी गुन्हेगारीविषयक कार्यक्रम पाहून त्याने आपल्या कुटुंबीयांचा खून करण्याचे ठरवले. अभिषेकने आपले आई वडील बहीण आणि आजीच्या डोक्यात गोळी मारली. यात आई वडील आणि आजीचा जागीच मृत्यू झाला तर. बहीणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.




























































