पिके बहरली, घोड व कुकडी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

557

श्रीगोंदा तालुक्याच्या घोड, कुकडी लाभक्षेत्राखालील रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांच्या पेरण्या होऊन पिके जोमाने बहरू लागली आहेत. त्यांना आता पाण्याची गरज भासू लागल्याने लाभक्षेत्राखालील शेतकरी वर्गातून होत आहे.

श्रीगोंदा तालुक्याला संजीवनी ठरलेले घोड व कुकडीचे डावे कालवे यांच्या लाभक्षेत्राखाली पुरेसा पाऊस झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. मान्सून अखेर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने खरीप बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी,तूर, उडीद, कांदा पिकांची मळणीपूर्वी वाट लागली. हातातोंडाशी आलेला घास सडून गेला. त्यातूनही स्वतःला सावरत बळीराजाने जमिनीचे वापसे झाल्यावर रब्बी हंगामातील पिकांच्या जोमदार पेरण्या केल्या आहेत. सध्या पिके जोमाने डौलत आहेत.

घोड डावा कालव्याचे पाण्याने कर्जत-श्रीगोंदा तालुक्यातील लाभक्षेत्राला मिळते. तर कुकडी डाव्या कालव्याचे पाणी शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना लाभ होतो. पाणी वाटपाचा नियम टेल टू हेड असल्याने श्रीगोंदा तालुक्याला आवर्तन सुटल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर मिळते.व आवर्तन सोडण्यासाठी सध्या पाटबंधारे विभागाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल, बैठका दिसत नसल्याने कालवा सल्लागार समितीची लवकरात लवकर बैठक घेऊन घोड, कुकडीचे रब्बी हंगाम आवर्तन सोडावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या