सरकारने देशाच्या नकाशावरून जम्मू-कश्मीरचं अस्तित्व मिटवलं – गुलाम नबी आझाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरला विशेष अधिकारी देणारे कलम 370 रद्दबातल करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका सुरुच आहे. गुरुवारी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-कश्मीरला जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना हवाईतळावर रोखण्यात आले आणि तिथूनच पुन्हा माघारी पाठवण्यात आले. यानंतर बोलताना आझाद यांनी सरकारवर टीका केली असून देशाच्या नकाशावरून जम्मू-कश्मीरचं अस्तित्व मिटवल्याचे ते म्हणाले.

विमानाद्वारे मी जम्मू-कश्मीर खोऱ्याचे हवाईदर्शन घेतले. तिथे महामार्गावर एकही गा़डी दिसली नाही. भाजपने देशाच्या नकाशावरून जम्मू-कश्मीरचं अस्तित्व मिटवल्याचे गुलाम नबी आझाद म्हणाले. कश्मीरमध्ये घरातून कोणीही बाहेर पडलेले नाही. एनडीएने काळा कायदा लागू केल्याची भावना त्यांच्या मनात आहे. खोऱ्यात कर्फ्यू लावून मोठ्या बहादुरी कोण दाखवत आहे? असा सवाल आझाद यांनी केला.

डोवाल यांच्यावर टीका
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना बुधवारी जम्मू-कश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील नागरिकांसोबत चर्चा केली आणि एकत्र भोजन घेतले. यावर आझाद यांनी निशाणा साधला असून याला काहीही महत्व नसल्याचे म्हटले. पैसे देऊन तुम्ही कोणालाही आपल्या बाजूने वळवू शकता असा आरोप त्यांनी केला.