
दिल्लीतील अलीपूर येथे एका निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळली असून त्याच्या मलब्याखाली दबून सहा मजूरांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत 14 जण जखमी झाले आहेत. अजूनही काही जण मलब्याखाली दबले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून त्यांनी मलबा हटविण्याचे काम सुरू केले आहे.
अलीपूर भागात एक मोठ्या गोदामाचे काम सुरू होते. तब्बल 25 ते 30 मजूर त्या ठिकाणी काम करत होते. शुक्रवारी दुपारी अचानक या गोदामाची एक भिंत कोसळली. या भिंतीच्या मलब्याखाली दबून सहा मजूर ठार झाले. 14 जखमींना राजा हरीश चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

























































