
गेल्या काही वर्षांत लोकांच्या कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. बैठे काम वाढले असून त्यामुळे असे काम करणाऱ्यांना शारिरीक त्रासही व्हायला लागले आहेत सलग बसून काम करणाऱ्या मंडळींना मान आणि पाठदुखीचे त्रास व्हायला लागले आहेत. खुर्चीत बसलो असताना नीट न बसल्याने किंवा पाठीला आणि मानेला योग्य तो आधार न मिळाल्याने हा त्रास होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणून गोदरेजने एक खुर्ची बाजारात आणली आहे. या खुर्चीत बसून काम करणाऱ्या व्यक्ती त्रास होत नाही आणि या खुर्चीमुळे त्याची बसण्याची पद्धत ही योग्य होते असा दावा करण्यात आला आहे. या खुर्चीसाठी 13 पेटंट घेण्यात आली असून जपान, अमेरिका, इंग्लंडमध्येही या खुर्चीला पेटंट मिळाली आहे. बसण्याची योग्य पद्धती राखणाऱ्या ही खुर्ची इतर देशांमध्येही निर्यात केली जाणार आहे. साधारणपणे कामकाजी मंडळी एक तृतीअंश आयुष्य बसून काढतो. आपल्या देशातील 70 टक्के व्यक्ती या साडेआठ तास बसून काम करतात. नीट बसून काम न केल्याने पाठीचे आणि मानेचे दुखणे सुरू होते. असे होऊ नये यासाठी ही खुर्ची तयार करण्यात आली आहे असे गोदरेज इंटिरियोचे वरिष्ठ व्हीपी समीर जोशी यांनी सांगितले. ही खुर्ची हिंदुस्थानात बनली असून ती जगभर जाणार असल्याचे ते म्हणाले. या खुर्चीची किंमत 55 ते 90 हजारांच्या घरात असेल असा अंदाज आहे.

































































