सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!

सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सणासुदीच्या दिवसात सोन्याला झळाळी आली आहे. बुधवारीही सोन्याच्या भावात वाढ झाली. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात 100 रुपयांनी वाढ होत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,06,200 रुपयांवर पोहचला. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 97, 400 रुपये मोजावे लागणार आहेत.

चांदीच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढ

सोन्यासह चांदीच्या किंमतीत मंगळवारच्या तुलनेत वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीत 900 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी चांदीचा भाव 1,27,000 रुपये प्रति किलो झाला.

गुंतवणुकीचे महत्वाचे साधन

हिंदुस्थानातील सोन्याचे दर आयात, आंतरराष्ट्रीय किंमती, शुल्क, कर आणि डॉलर-रुपया विनिमय दर यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामुळेच सोन्याचे दर दररोज बदलतात. हिंदुस्थानात सोने हे गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.