ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दिवाळे निघाले; 12 वर्षातील विक्रमी घसरण

या वर्षात सोन्या-चांदीने दरवाढीचा उच्चांक गाठला होता. दौोन आठवड्याभरापुर्वी चांदीचे दर दोन दिवसात तब्बल 10 हजार रुपयांनी वाढले होते. जागितक अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेवर असलेल्या संकटामुळे सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ होत होती. तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला सोने -चांदी खरेदी करण्याच्या पंरपरेमुळे मागणीत प्रंचड वाढ झाली होती. अनेक ठिकाणी चांदीचा पुरवठा नसल्याने त्याचा तुटवडाही जाणवत होता. मात्र, लक्ष्मीपूजनानंतर ऐन दिवाळीत सोन्यां-चांदीचे दिवाळे निघाले आहे.

ऐन दिवाळीत वधारलेले सोने आणि चांदीचे दर लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात घसरले. या घसरणीने 12 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. जागतिक बाजारात मंगळवारी सोन्यात 6.3 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली. तर चांदीतही मोठी घसरण झाली आहे. सोन्या-चांदीतील तेजीमुळे ज्यांनी जास्त दराने खरेदी केली, ते या घसरणीने अडचणीत आले आहेत. घसरणीचे हे सत्र लवकरच थांबेल आणि सोने-चांदी पुन्हा मोठी झेप घेतील अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एखाद्या कमोडिटीचे दर वाढले की त्यात थोडी घसरण होते, त्यामुळे या घसरणीने घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने एकाच दिवसात 6.3 टक्क्यांनी घसरले. तर चांदीत 7.1 टक्क्यांनी घट झाली. एकाच दिवसात इतकी मोठी घसरण होण्याचा 12 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला. मंगळवारनंतर बुधवारी मूहूर्त ट्रडिंगमध्येही त्यात घट झाली. आशियाच्या बाजारात सोन्याचा भाव 2.9 टक्क्यांनी घसरून 4004.26 डॉलर प्रति औंसवर पोहचल्या. तर चांदीत 2 टक्क्यांची घसरण झाली. चांदी 47.89 प्रति औंसवर आली.

सोन्याच्या किंमतीत 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण दिसली. दिवाळीनंतर चांदीही घसरली. चांदीत फेब्रुवारी 2021 नंतर सर्वात मोठी घसरण दिसली. या वर्षात सोने आणि चांदीने यंदा 50 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. आता सोन्यात प्रॉफिट बुकिंग सुरू झाल्याने किमतीत घट झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

24 कॅरेट शुद्धतेच्या 1 ग्रॅम सोन्यात 17 ऑक्टोबर रोजी 333 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 1 ग्रॅम सोन्यात अनुक्रमे 191 रुपये, 17, 11 आणि 469 रुपयांची मोठी घसरण झाली. 1 लाख 31 हजार 001 रुपयांहून सोने आता थेट 1 लाख 26 हजार 003 रुपयांपर्यंत घसरले आहे. गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 26 हजार 003 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 15 हजार 540 रुपये असा आहे.

एक किलो चांदी 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली होती. पण दिवाळीपासून चांदीत मोठी घसरण दिसली. 31 हजारांनी चांदीचा भाव आपटला आहे. 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 1 हजार आणि 4 हजारांनी चांदी उतरली. 18 ऑक्टोबरला सकाळच्या सत्रात चांदीत 13 हजारांची महा घसरण झाली. त्यानंतर अनुक्रमे 8 हजार, 4 हजारांची घसरण नोंदवली गेली. एक किलो चांदीचा भाव आता 1,59,900 रुपये इतका आहे.