
यंदाच्या वर्षात सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. तसेच अमेरिका- व्हेनेझुएलातील संघर्षामुळे दर गगनाला भिडले होते. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने आता बुधवारी या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. बुधवारी एका दिवसात चांदीचे दर 10 हजार तर सोन्याचे दर दीड हजारांनी घसरले आहेत. ही घसरण नफावसुलीमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी काळात या दोन्ही धातूंमध्ये तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सोने आणि चांदीच्या किमती बुधवारी मोठ्या प्रमाणात घसरल्या. चांदीच्या किमती सुमारे 10 हजार रुपयांनी घसरल्या आणि सोन्याच्या किमतीतही दीड हजाराची घसरण झाली आहे. अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये चांदीचे दर बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास 10 हजार रुपये किंवा ३.७४% ने घसरून २,४८,११५ रुपये प्रति किलो झाले.
चांदीप्रमाणे सोन्याच्या किमतीतही लक्षणीय घट झाली. बुधवारी सोन्याचे दर १,३३२ रुपयांनी घसरून १,३७,७५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. सोन्याचा विक्रमी उच्चांक १,४०,४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. ५ फेब्रुवारीच्या फ्युचर्ससाठी सोन्याचे दर आज सुमारे १% ने घसरले. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात नफा बुक करत आहेत. सोन्यावरही नफावसुली झाली आहे.
सोने-चांदीच्या किमती त्यांच्या विक्रमी उच्चांकाजवळ आहेत. त्यामुळे, नफा-वसुलीमुळे अल्पावधीसाठी ते कमी होऊ शकतात. परंतु दीर्घकाळात, मागणी सुधारल्यामुळे परिस्थिती मजबूत राहते. २०२६ मध्ये धातूच्या किमती उच्च राहिल्यामुळे तज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेक बँका आणि तज्ञांना सोने आणि चांदीचे दर स्थिर राहतील, नवीन उच्चांक गाठले नाहीत तर मजबूत आधाराने स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. काहींचा असा विश्वास आहे की या किमती आणखी वाढू शकतात. काही तज्ञांनी किंमत कमी झाल्यावर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा सल्लाही काही तज्ज्ञांनी दिला आहे.





























































