बीड जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बीड

बीड जिल्ह्यामध्ये गोवर – रुबेला लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. हे अभियान बीड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकिशन पवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. बीड जिल्ह्यात नऊ महिने ते पंधरा वर्षे वयाची तब्बल सात लाख तीस हजार बालके असून त्यांना या दोन आजारांपासून संरक्षण मिळावं यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे.  लसीकरणासाठी सहा हजार तीनशे पथक तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी करडी नजर ठेवणार आहे. लस देणाऱ्या पाचशे 36 लस टोचकांची नियुक्ती करण्यात आली आहे, बीड जिल्ह्यातील जवळपास चार हजार शाळांमध्ये आणि तीन हजार अंगणवाडी मध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे, या साठी तीन हजार अंगणवाडी कार्यकर्त्या, दोन हजार आशा यांची मदत घेतली जाणार आहे, बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊस तोड कामगारांच्या मुलांना देखील ही लस दिली जाणार आहे.