
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातील हजारो करदात्यांचे ७० हजार कोटी रुपये इन्कमटॅक्स डिपार्टमेंटने आतापर्यंत परत (रिफंड) केले आहेत. जादा कर जमा केल्याबाबतचे सर्व दावे जूनपर्यंत निकाली काढण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली.
हे दावे निकाली काढण्यासाठी आयकर विभागाने १ जून ते १५ जून दरम्यान विशेष पंधरवडय़ाचे आयोजन केले होते. दावे लवकरात लवकर निकाली निघावेत यासाठी काही राज्ये, शहरांमध्ये या पंधरवडय़ाची मुदत ३० जूनपर्यंतही वाढवली होती. या खास मोहिमेत अपिलात आलेल्या दाव्यापैकी २० हजारांपेक्षा अधिक दावे निकाली काढले आहेत. ज्यांच्याकडून अतिरिक्त कर घेतला त्या संबंधित करदात्यांना तो रिफंड केला आहे.




























































