
जगभरात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा दर जास्त असला तरीही हिंदुस्थानात मृत्युदर कमी आहे. याचे मुख्य श्रेय आपले सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस व निष्ठेने कार्य करणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांकडे जाते. येत्या 1 ते 2 महिन्यात देशातील कोरोनाचा मृत्युदर 1 टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केला.
कोरोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱया मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ऍण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि जे. जे रुग्णालयातील कोविड योद्धे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स, विभागप्रमुख, मॅट्रन व स्वच्छता निरीक्षकांचा राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रूगणालयाचे डीन डॉ रणजित माणकेश्वर, राज्याच्या कोविड लॅबोरेटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर, यांसह 33 कोविड कॉरियर्सचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
डॉक्टरच देव
आपल्या संस्कृतीमध्ये माता-पिता व गुरू यांना देव मानले जाते. यापैकी देवाला कुणी पाहिले नाही. परंतु, जेव्हा प्रकृती बिघडते त्यावेळी डॉक्टरच आपल्यासाठी देव असतात. कोरोनाच्या रूग्णांना शासकीय रुग्णालयात अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने उपचार देण्यात येत आहेत. आपण स्वतः रुग्णांना नेहमी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतो असे सांगून राजभकन येथील अनेक कोरोनाबाधित कर्मचारी शासकीय रुग्णालयातील उपचारांमुळे पूर्णपणे बरे झाल्याचे राज्यपालांनी आवर्जून सांगितले.
खरे कोरोना योद्धे
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन्स), स्वच्छता निरीक्षक हे खरे करोना योध्दे असल्याचे आहे. आपल्याला संसर्ग होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असूनदेखील त्यांनी सर्वांना हिम्मतीने सेवा दिली असे कैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.





























































